डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी, पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी? पाहा…

| Updated on: Apr 06, 2023 | 1:40 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने पाहणी केली. दरम्यान सध्या या पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी आहे याचा आढावा घेतला आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी...

गाझियाबाद, उत्तर प्रदेश : इंदू मिल स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारण्यात येणार आहे. या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशमधल्या गाजियाबादमध्ये तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने पुतळ्याची पाहणी केलीय. 350 फुटांचा ब्रॉन्झचा पुतळा स्मारकामध्ये साकारला जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नाही. स्मारकामध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या सभागृहमधील संख्येवरून आता वाद निर्माण झालाय. सरकारने आर्किटेक्चर नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार यामीनी जाधव यांनीही सरकारकडे मागणी केली केली आहे.  दरम्यान सध्या या पुतळ्याची प्रतिकृती नेमकी कशी आहे ? पाहा…

Published on: Apr 06, 2023 01:40 PM
जवळीक वैगेरे काही नाही, शेतावर भेटलो होतो इतकच; पवार भेटीवर देशमुखांचे स्पष्टीकर
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अहवालावर महिला आयोग आसमाधानी