Uttarkashi Tunnel Collapse : उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, बोगद्याचा भाग कोसळला अन् ५० ते ६० मजूर अडकले
ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांवपर्यंत नवयुगा कंपनीमार्फत बोगदा खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूस्खंलन होऊन ५० मीटरचा बोगद्याचा भाग आत कोसळला यामध्ये ४० ते ५० मजून अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, फायर सर्व्हीस यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंड, १२ नोव्हेंबर २०२३ | उत्तरकाशीत बांधकाम सुरु असलेल्या बोगद्याचा ५० मीटरचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री अचनाक उत्तरकाशीत यमुनोत्री महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांव पर्यंतच्या भुयारी मार्गाचे काम सुरु असताना बोगद्याचा काही भाग कोसळला. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांवपर्यंत नवयुगा कंपनीमार्फत बोगदा खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूस्खंलन होऊन ५० मीटरचा बोगद्याचा भाग आत कोसळला यामध्ये ४० ते ५० मजून अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सध्या सुरक्षित आहे. त्यांच्याकडे ऑक्सिजनचे सिलेंडर देखील आहे. तसेच एक ऑक्सिजनचा पाईप देखील आत बोगद्यात सोडण्यात आला आहे. त्यातून त्या सर्व अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ, एनडीआरएफ, फायर सर्व्हीस यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे.