VIDEO : Satara Crime | बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यातील गुंड पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : Satara Crime | बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यातील गुंड पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 21, 2021 | 12:35 PM

सातारा जिल्ह्यातील चंदन नगर येथील गुंड वैभव जाधवने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

गाडीच्या बोनेटवर बसून गुंडाने तलवारीने केक कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्ह्यातील चंदन नगर येथील गुंड वैभव जाधवने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करत गाडीच्या बोनेटवर बसून वैभवने बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. त्यानंतर तलवारीने केक कापत त्याने उन्मादाचं प्रदर्शन केलं. यावेळी जोरजोरात गाणी लावून गुंडाच्या 15 ते 20 मित्रांनी रस्त्यावर नाच केल्याचा प्रकारही घडला.