कोणी आणलं कलेक्टरिन बाईंना अडचणीत? 'या' तरूणाचं एक ट्विट अन् राज्यात खळबळ, कोणी केला पूजा खेडकरचा पर्दाफाश?

कोणी आणलं कलेक्टरिन बाईंना अडचणीत? ‘या’ तरूणाचं एक ट्विट अन् राज्यात खळबळ, कोणी केला पूजा खेडकरचा पर्दाफाश?

| Updated on: Jul 22, 2024 | 11:31 AM

खासगी गाडीवर अंबर लाल दिवा, भारत सरकारची पाटी आणि प्रशासनाकडे दिखाव्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे पूजा खेडकर यांची देशभरात चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या प्रकरणाता पर्दाफाश केलाय बीडच्या एका तरूणानं.. ६ जुलै रोजी वैभव कोकाट याने पूजा खेडकरसंदर्भात एक ट्वीट केलं आणि...

गेल्या काही दिवसांपासून देशपातळीवर वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. हेच प्रकरण बीडमधील एका तरूणाने समोर आणलं होतं. खासगी गाडीवर अंबर लाल दिवा, भारत सरकारची पाटी आणि प्रशासनाकडे दिखाव्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे पूजा खेडकर यांची देशभरात चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांच्या प्रकरणाता पर्दाफाश केलाय बीडच्या एका तरूणानं.. ६ जुलै रोजी वैभव कोकाट याने पूजा खेडकरसंदर्भात एक ट्वीट केलं आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली. नियम सांगतो की, खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या २०२२ बॅच आयएएस पूजा खेडकर यांनी व्हीआयपी नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा आणि महाऱाष्ट्र शासन असं लिहिलं….वैभवला या प्रकरणाचा सुगावा कसा लागला? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 22, 2024 11:31 AM