Video : ईडी चौकशी आणि अटक होणार हे राऊतांना आधीच माहिती होतं-वैभव नाईक

Video : ईडी चौकशी आणि अटक होणार हे राऊतांना आधीच माहिती होतं-वैभव नाईक

| Updated on: Jul 31, 2022 | 2:54 PM

भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात जे विरोधी पक्षात काम करता आहेत त्यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशा लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करता आहेत.एकतर तुम्ही जेल मध्ये जा किंवा भाजपमध्ये या.सत्तांतरातील अनेक आमदार ईडीच्या रडारवर होते.संजय राऊत यांचा आम्हा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे.आपल्याला अटक होणार हे त्यांना आधीच माहीत होतं. संजय राऊत याआधी ईडीच्या (ED) चौकशीला गेले […]

भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात जे विरोधी पक्षात काम करता आहेत त्यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशा लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करता आहेत.एकतर तुम्ही जेल मध्ये जा किंवा भाजपमध्ये या.सत्तांतरातील अनेक आमदार ईडीच्या रडारवर होते.संजय राऊत यांचा आम्हा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे.आपल्याला अटक होणार हे त्यांना आधीच माहीत होतं. संजय राऊत याआधी ईडीच्या (ED) चौकशीला गेले होते पण त्यांना त्यांनी कुठलाच प्रश्न विचारला नाही.उलट त्यांनी सांगितलं तुम्हाला अटक करण्याचे आम्हाला वरून आदेश आहेत.संजय राऊत यांच्या पाठीशी आमही ठाम आहोत.न्यायालयाच्या निर्णयात जरी संजय राऊत यांना न्याय मिळाला नाही तरी जनतेच्या अदालतीत त्यांना न्याय मिळेल याची खात्री आहे, असं वैभव नाईक (Vaibhav Naik) म्हणाले आहेत.