नागपुरात उद्या ‘मविआ’ची वज्रमूठ सभा, कशी असणार आसनव्यवस्था?
VIDEO | नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी, उद्याच्या सभेत एकीची वज्रमूठ पाहायला मिळणार ? सभेची तयारी अंतिम टप्प्यात
नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नागपूर पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे 16 एप्रिल रोजी नागपूर शहरात महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून आसनव्यवस्था करण्यात आले आहे. ही आसनव्यवस्था पोलिसांकडून मोजण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मविआमध्ये काही अलबेल नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसतेय. त्यामुळे उद्या होणाऱ्या सभेत नेमकं कोण काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.