Special Report | ‘मविआ’ची वज्रमूठ सभा यापुढे होणार नाही?; कुणी काय केला दावा, बघा…
VIDEO | मुंबईतली महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा शेवटची? मविआची यापुढे सभा होणार नाही, याचा अर्थ काय? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मुंबईमध्ये महाविकास आघाडीची तिसरी सभा झाली. पण ही सभा शेवटची आहे. यापुढे त्यांची एकत्रित सभा होणार नाही, अशी टीका भाजपनं केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआच्या सभेला तीन तिघाडा काम बिघाडा असे म्हणत टीका केली. मुंबईच्या बीकेसी येथे मविआची सभा झाली. मात्र ही सभा शेवटची असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला. तर तीन तिघाडा काम बिघाडा असा मुख्यमंत्री शिंदे यांनी हल्लाबोल केला. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या तीन सभा झाल्या पहिली सभा २ एप्रिल रोजी संभाजीनगर, दुसरी सभा १६ एप्रिल रोजी नागपूर येथे तर तिसरी सभा १ मे रोजी मुंबईत झाली. पण मुंबईत झालेली मविआची सभा ही शेवटची असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून का केला जातोय. शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांच्याबाबत मोठी आशावादी आहे. २ ते ४ दिवसात अजित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे हे लवकरच कळेल, दादा नेमका काय निर्णय घेणार? असे आमदार संजय शिरसाट म्हणाले. यापूर्वीही कित्येकदा शिरसाट यांनी अजित पवार यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. मात्र आता लवकरच अजितदादा निर्णय घेतली असे वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.