‘मविआ’च्या वज्रमूठसभेची तयारी पूर्ण; अशी आहे व्यवस्था, बघा ड्रोन दृश्य
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार विराट सभा, जाहीर सभेला उरले अवघे काही तास, सभेची संपूर्ण तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज २ एप्रिल रोजी संध्याकाळी महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. भव्य सभा मंडप तयार करण्यात आला आहे. मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात हजारो खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. सभेच्या ठिकाणीच 16 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नाक्या नाक्यावर बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपासूनच मैदानात लोकांनी जमण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरणात सभेचा फिवर निर्माण झाला आहे. संपूर्ण संभाजीनगरात तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच चौकाचौकात पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. बघा ड्रोनच्या नजरेतून कशी आहे व्यवस्था