Santosh Deshmukh Case : बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?

Santosh Deshmukh Case : बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?

| Updated on: Jan 02, 2025 | 10:46 AM

वाल्मिक कराडवर सरपंच हत्या प्रकरणाशी संबधित पवनचक्की प्रकल्पात दोन कोटी रूपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माईंड वाल्किम कराडच असल्याचा आरोप केला जातोय.

बीडच्या मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग आता वाढला आहे. १४ दिवसांची कोठडी देण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडची सीआयडीने कसून चौकशी केली. सीआयडीचे एसपी सचिन पाटील यांनी वाल्मिक कराडवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. वाल्मिक कराडवर सरपंच हत्या प्रकरणाशी संबधित पवनचक्की प्रकल्पात दोन कोटी रूपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माईंड वाल्किम कराडच असल्याचा आरोप केला जातोय. अजूनही तीन आरोपी फरार आहेत. त्यापैकी सुदर्शन घुले याच्याकडे सीआयडीने आपला मोर्चा वळवला आहे. वाल्मिक कराडची चौकशी करताना सीआयडीने सरपंच संतोष देशमुखांना ओळखतो का? २२ दिवस फरार का राहिला, कुठे-कुठे फिरला? सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली याची काही माहिती आहे का? खंडणीच्या प्रकऱणात तुझ्यावर गुन्हा आहे, त्यावर काय म्हणायचं आहे. दोन कोटींच्या खंडणीची मास्टरमाईंड कोण आहे, कोण-कोण त्यात सहभागी आहे. दोन कोटींच्या खंडणीपैकी ५० लाख पवनचक्कीच्या कंपनीने दिले होते का? खंडणीचं कनेक्शन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी आहे का? असे एक न अनेक सवाल केले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 02, 2025 10:46 AM