वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं तर आज परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड समर्थक हे राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढल्याचे पाहायला मिळाले तर यापैकी एकाला भोवळ आल्याची माहिती मिळतेय.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला महिना उलटून गेला. दरम्यान, या प्रकऱणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. तर या प्रकऱणातील ८ आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. मात्र यातून वाल्मिक कराड सुटलाय. त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. भावाला न्याय मिळावा म्हणून . काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं तर आज परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा देवमाणूस असल्याचे म्हणत वाल्मिक कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन आक्रमकपणे आंदोलन सुरू केलं आहे. वाल्मिक कराड समर्थक हे राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढल्याचे पाहायला मिळाले तर यापैकी एकाला भोवळ आल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहे. माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला सोडा. त्याचा याप्रकरणाशी काही संबंध नाही, असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे.