शिरूर लोकसभेत चर्चांची धांदल, ‘वंचित’ने बदलला आपला उमेदवार मंगलदास बांदल
भाजपशी जवळीक असलेल्या उमेदवाराला (मंगलदास बांदल) वंचितने कसं तिकीट दिलं? असा सवाल करत चर्चांना उधाण आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्या चर्चांना आणखी बळ मिळालं. मात्र यादरम्यान वंचितने जाहीर केलेली उमेदवारी रद्द
शिरूरमधून वंचितने जाहीर केलेल्या उमेदवाराचं नाव रद्द करण्यात आलं आहे. भाजपशी जवळीक असलेल्या उमेदवाराला (मंगलदास बांदल) वंचितने कसं तिकीट दिलं? असा सवाल करत चर्चांना उधाण आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्या चर्चांना आणखी बळ मिळालं. मात्र यादरम्यान वंचितने जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली मात्र ती रद्दही केली. भाजपचा माणूस, वंचितचा उमेदवार म्हणून सोशल मीडियावर पडसाद उमटू लागले. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फडणवीसांच्या भेटीनं मंगलदास बांदल यांची उमेदवारी चर्चेत आली होती. १ एप्रिल रोजी मंगलदास बांदल भाजपच्या प्रचारास सामील झाल्याचे पाहायला मिळाले तर त्याच्या ४८ तासांनंतर बांदल यांनी वंचितने शिरूरमधून तिकीट दिलं. यानंतर इंदापुरात बांदल यांनी फडणवीसांची भेट घेतली. मात्र यादरम्यान, वंचितच्या भूमिकेवर टीका झाली आणि वंचितकडून बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…