चिंचवडमध्ये मविआची चिंता वाढली! अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ‘या’ पक्षानं दिला पाठिंबा
VIDEO | ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल अन् आता या पक्षानं दिला पाठिंबा
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे अपक्ष आमदार असलेले राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे, त्याबाबच पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. आजचं वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांच्याही चिंतेत वाढ होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Published on: Feb 16, 2023 05:17 PM
Latest Videos