माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण..., प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा काय?

माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण…, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा काय?

| Updated on: Nov 28, 2023 | 1:29 PM

भुजबळ हे माझ्यामुळे जेल बाहेर आहेत पण त्यांनी कधी माझे आभार मानले नाही, अशी खंत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. छगन भुजबळ यांना त्यावेळी जेलमधून बाहेर सोडत नव्हते. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो.

पुणे, २८ नोव्हेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ हे माझ्यामुळे जेल बाहेर आहे, असं मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भुजबळ हे माझ्यामुळे जेल बाहेर आहेत पण त्यांनी कधी माझे आभार मानले नाही, अशी खंत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. छगन भुजबळ यांना त्यावेळी जेलमधून बाहेर सोडत नव्हते. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. तर पुढे आंबेडकर असेही म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्या जजवर देखील कारवाई होऊ शकते, हे भुजबळांनी लक्षात घ्यायला हवे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर सोडण्यात आले आहे. मात्र छगन भुजबळ यांनी त्याबाबत कधी माझे आभार मानले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Nov 28, 2023 01:29 PM