‘कोकणाची वाट लावू नका’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘या’ नेत्यानं थेट सुनावलं
VIDEO | बारसू रिफायनरी प्रकल्पावर भाष्य करताना विरोध दर्शवत 'या' नेत्यानं मुख्यमंत्र्यावर नेमकी काय केली टीका?
बदलापूर : बारसू रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तर, बारसू प्रकल्पाला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही विरोध होता. एन्रॉन घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. एकनाथ शिंदेंना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. केंद्रातून फोन आले की यांच्या भूमिका बदलतात. कोकणात 95 टक्के ऑक्सिजन आहे. तिथे फ्लोरा आणि फोना जन्माला येतो. प्रदूषणमुक्त परिसर असल्यामुळे हे होतं. तो परिसर तसाच राहायला हवा. राहिला कोकणातल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर अंतुले जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले की, मला पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करू शकतो. त्यांच्याच काळात गाव तिथे एसटी सुरू झालं. पण नंतर त्यांच्यावर गंडांतर आणून त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं. इंडस्ट्री येऊन कोकणात रोजंदारी वाढेल असं नाही, तर कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं प्लॅनिंग करून व्यापार, छोटे उद्योग सुरू केले, तर तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचं उत्पन्न वाढेल, असं त्यांनी म्हटले आहे.