Prakash Ambedkar यांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, बघा काय म्हणाले?
VIDEO | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरून मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. म्हणाले, 'राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी आमची तयारी सुरू'
मुंबई, 25 सप्टेंबर 2023 | लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात अशी परिस्थिती राज्यात आहे. ठाकरे गटासोबत अजून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तसेच राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी आमची तयारी सुरू आहे तर सगळ्या शक्यता लक्षात घेता आम्ही ४८ जागांची तयारी सुरू केली असल्याचे मोठं वक्तव्य वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये. महाविकास आघाडीचं जागा वाटप झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचितच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. मात्र, काहीच होत नाही असं गृहीत धरत आम्ही ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवरून केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील यामुळे वर्तवली जात आहे.