अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, आम्ही त्यांचं..., प्रकाश आंबेडकरांकडून मोठी ऑफर

अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, आम्ही त्यांचं…, प्रकाश आंबेडकरांकडून मोठी ऑफर

| Updated on: Jul 16, 2024 | 5:55 PM

अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठी राजकीय ऑफर दिली आहे. त्यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाहीतर आपण दादांचं पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करु... विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात भूकंप होणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठी राजकीय ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहेत. आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करुन देऊ, असं आश्वासनच प्रकाश आंबेडकर यांनी या ऑफरच्या माध्यमातून दादांना दिलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात भूकंप होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 16, 2024 05:55 PM