Prakash Ambedkar म्हणाले, ‘संपूर्ण INDIA आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलीय’
VIDEO | 'संपूर्ण इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे', इंडिया आणि भारत नावावरून वाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय केलं भाष्य? बघा...
पुणे, ६ सप्टेंबर २०२३ | सध्या देशात सुरू असलेल्या भारत आणि इंडिया या नावाच्या वादावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. इंडिया आणि भारत या वादात विरोधी पक्ष हा भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकत चालला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते म्हणाले, “संपूर्ण इंडिया आघाडी सध्या भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकली आहे. भारत आणि इंडिया हे एकमेकांच्या विरोधात नाही. मी इंडियाचा भाग आहे की, नाही येत्या दोन दिवसात पक्षाची भूमिका जाहीर करणार आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यात ओबीसी, मराठा आणि मराठा वंजारी वाद लावायचं सध्या काम सुरू आहे असं ते म्हणाले.
Published on: Sep 06, 2023 03:49 PM
Latest Videos