लोकसभा-विधानसभेची लगबग, सर्वच राजकीय पक्षांसह 'वंचित'चं लक्षही राजधानी मुंबईवर

लोकसभा-विधानसभेची लगबग, सर्वच राजकीय पक्षांसह ‘वंचित’चं लक्षही राजधानी मुंबईवर

| Updated on: Oct 23, 2023 | 11:30 AM

tv9 marathi special report | मुंबईतील सर्व 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे तर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबतची संभ्रमावस्था अद्याप काही दूर झालेली नाही. अशास्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं.

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | सध्या लोकसभा-विधानसभेचं वारं वाहू लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष राजधानी मुंबईवर लागलंय. वंचित बहुजन आघाडीनेही मुंबईतील सर्व 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबाबतची संभ्रमावस्था अद्याप काही दूर झालेली नाही. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी राज्यात सध्या हे चित्र असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचं काय? असा प्रश्न विचारला जातोय. अशावेळी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या बैठकीत मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलाय. मुंबईवर सध्या सर्वांच्याच नजरा आहेत. भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीनंतर आता मनसे आणि वंचितही मुंबईसाठी जीव तोडून कामाला लागलेत. सर्वच पक्षांच्या आढावा बैठका, मेळावे, सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन, नेत्यांचे दौरे जोरात सुरु आहेत. अशास्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं. बघा भेटीत नेमकं काय झालं.

Published on: Oct 23, 2023 11:30 AM