कोण संजय राऊत, ते माझ्या पक्षाचे सदस्य नाहीत, 'या' नेत्यानं राऊत यांना फटकारलं

कोण संजय राऊत, ते माझ्या पक्षाचे सदस्य नाहीत, ‘या’ नेत्यानं राऊत यांना फटकारलं

| Updated on: Jan 28, 2023 | 10:37 AM

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत आमने-सामने

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. कोण संजय राऊत, ते माझ्या पक्षाचे सदस्य नाहीत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी फटकारल्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमची युती शिवसेनेसोबत आहे. ठाकरे यांनी सल्ला दिला असता तर मानला असता, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तर मी कोण हे उद्धव ठाकरेच ठरवतील असे म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे.

Published on: Jan 28, 2023 10:37 AM