आनंदराज आंबेडकर लोकसभेचा अर्ज मागे घेणार? 'वंचित'नं काय केली विनंती?

आनंदराज आंबेडकर लोकसभेचा अर्ज मागे घेणार? ‘वंचित’नं काय केली विनंती?

| Updated on: Apr 04, 2024 | 4:21 PM

प्रकाश आंबेडकर यांनी पत्र पाठवून उमेदवारी मागे घेऊ नये, आणि त्यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केले होते

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 तारखेला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती आणि वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती, परंतु वंचितने पाठिंबा न दिल्याने आनंदराज आंबेडकर यांनी खंत व्यक्त केली, मात्र तरीही भाजप निवडून येऊ नये यासाठी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रातून माहिती दिली. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्र पाठवून उमेदवारी मागे घेऊ नये, आणि त्यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केले होते

Published on: Apr 04, 2024 04:20 PM