New Year Project : 2025 मध्ये राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार? राज्य सरकारकडून ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा
राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प या वर्षी पूर्ण होणार आहेत. राज्य सरकारकडून महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा यंदाच्या वर्षात पूर्ण होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
आज नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आहे. 2025 या नव्या वर्षामध्ये राज्यातील विविध पायाभूत प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना विमान प्रवास सुखकर करता येणार आहे. राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प या वर्षी पूर्ण होणार आहेत. राज्य सरकारकडून महत्त्वाच्या प्रकल्पाची घोषणा यंदाच्या वर्षात पूर्ण होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळावरून मे महिन्यात देशांतर्गत उड्डाण सुरू होणार आहेत. त्यामुळे नवीन मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी असणार आहे. त्यानंतर मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो ही सुद्धा 2025 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होणार असून 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग 2025 च्या मध्यापर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यासोबतच 2025 मध्ये बीपीएक्स क्रूझ टर्मिनल उघडल्यानंतर मुंबई हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनणार आहे. जून 2025 पासून मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. सांताक्रूझ-चेम्बूर लिंक रोड म्हणजेच एससीएलआर विस्तार 2025 च्या सुरुवातीला पूर्ण होणार आहे. तर ऐरोली-काटई नाका बोगदा 2025 मध्ये पूर्णपणे तयार होणार आहे. यासह पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरमुळे कर्जत-दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास कमी वेळात पार करता येणार आहे. तर गोरेगाव-मुंबई लिंक रोड प्रकल्पासाठी दुहेरी बोगद्यांचे बोरिंग सुरू होणार आहे, असे हे महत्त्वाचे प्रकल्प 2025 मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे.