वारकरी भक्तांना विठ्ठल पावला; वारकऱ्यांची कोणती मनोकामनाही झाली पुर्ण, पहा काय झालं?

वारकरी भक्तांना विठ्ठल पावला; वारकऱ्यांची कोणती मनोकामनाही झाली पुर्ण, पहा काय झालं?

| Updated on: Jun 25, 2023 | 1:11 PM

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. येथे अकलूज पालखीचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी पालखी सोहळ्यात पहिल्यांदाच नीरा नदीत पाणी नसल्याने माऊलींच्या पादूकांना टँकरने पाणी स्नान घालण्यात आलं होतं.

पंढरपूर : हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ अशा स्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिसेने मार्गस्थ होत आहे. काल जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. येथे अकलूज पालखीचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी पालखी सोहळ्यात पहिल्यांदाच नीरा नदीत पाणी नसल्याने माऊलींच्या पादूकांना टँकरने पाणी स्नान घालण्यात आलं होतं. त्यानंतर समस्त वारकरी बांधवांना चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करता येणार की नाही याची चिंता लागली होती. मात्र आता ही चिंता दूर झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं होतं. ते पाणी आज तेच पाणी आता पंढरपुरात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे वारकरी भक्तांना आता चंद्रभागा स्नानाचा आनंद लुटता येणार आहे

Published on: Jun 25, 2023 01:11 PM