आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार; वारकरी म्हणाले आम्हाला ‘ही’ अपेक्षा
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बिजेदिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतायेत. पण त्याच बिजेसाठी पुण्याच्या देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांना फडणवीसांच्या गृह विभागाकडून नाहक त्रास दिला जातोय. त्यामुळं देहू संस्थान आणि पोलिसांमध्ये वादाचा रंग पाहायला मिळतोय.
देहू,पुणे : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अवघ्या राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. कोणत्या विभागाला काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उद्योगा बरोबर सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देखील अपेक्षा आहे.आज देहूत बीज सोहळा पार पडत आहेत. अनेक वारकरी, शेतकरी या सोहळ्यासाठी देहू नगरीत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून नक्की काय अपेक्षा आहेत? आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी…
Published on: Mar 09, 2023 11:16 AM
Latest Videos