मीरारोड आणि वसतिगृह हत्याप्रकरणांवरून काँग्रेस नेत्याची सरकारवर टीका, म्हणाला, सरकार असंवेदनशील!
काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर वर्षा गायकवाड अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. मुंबईतील मीरारोड हत्याप्रकरण आणि वसतिगृहातील विद्यार्थीनीची अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
मुंबई : काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर वर्षा गायकवाड अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. मुंबईतील मीरारोड हत्याप्रकरण आणि वसतिगृहातील विद्यार्थीनीची अत्याचार करुन हत्या केल्या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. “शनिवारी मी वस्तीगृहाला भेट दिली, पीडितेच्या पालकांना भेटले. पालकांनी मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर दुःख व्यक्त केलं. सरकारने त्यांना साधं विचारलं सुद्धा नाही. इतकं असंवेदनशील सरकार मी पाहिलेले नाही. सरकारमधील मंत्र्यांना वेळ नाही, पालकांनी अंत्यसंस्कार जरी केलेले असले, तरी त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला हक्क मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. महिलांना मंत्रिपद द्यायचं नाही, महिला सक्षमीकरणावर बोलणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की, महिलांना संघटनेमध्ये महत्वाची पदं दिली पाहिजेत.मिरा रोड आणि सावित्रीबाई फुले वस्तीगृहात झालेल्या घटनांचा मी निषेध करते आणि यावर त्यांच्या पालकांना भेटायला मंत्री महोदयांना वेळ नाही त्यांचाही निषेध करते”, असं वर्षा गायवाड म्हणाल्या.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
