Vasai Crime | आई सतत दारुच्या नशेत असल्याने मुलानेच आईला संपवलं, वसई कोळीवाडा परिसरातील घटना
आई सतत दारुच्या नशेत असते, म्हणून किशोरवयीन मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात 59 वर्षांच्या महिलेची मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी 18 वर्षांच्या सख्ख्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आई सतत दारुच्या नशेत असते, म्हणून किशोरवयीन मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात 59 वर्षांच्या महिलेची मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी 18 वर्षांच्या सख्ख्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसईत 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या 59 वर्षांच्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. आई सतत दारुच्या नशेत असते, या रागातून मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये मंगळवार 21 जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला. आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Latest Videos