हौशेला मोल नाही! वडिलांनी मुलाच्या प्रेमापोटी आणला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केक, बघा व्हिडीओ
VIDEO | बापाने मुलाच्या प्रेमापोटी वाढदिवसानिमित्त चक्क hyundai verna या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केकच मागविला, होतेय सर्वत्र चर्चा
वसई : हौशेला मोल नाही असं नेहमी म्हटलं जात. मात्र या म्हणीचा प्रत्यय वसईच्या कामन परिसरात आल्याचे पहायला मिळाले. एका बापाने आपल्या मुलाच्या प्रेमापोटी वाढदिवसानिमित्त चक्क hyundai verna या कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा 2 लाख 65 हजारांचा केकच मागविला. आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस 221 किलोचा केक कापून मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. या वाढदिवसाची आणि या अनोख्या केकची संपूर्ण वसई तालुक्यात चर्चा होत आहे. इतका महागडा केकं आणि त्यावर हुबेहुब प्रतिकृती असलेली वेरना कारचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. वसईच्या कामन येथील नवीत हरिश्चंद्र भोईर हे त्याच परिसरातील खिंडपाडा या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लग्नाच्या 6 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. मात्र जन्मानंतर त्याला इन्फेक्शन झाल्याने तो अनेक दिवस आजारीच होता. भोईर यांनी त्यांच्या मुलाचे नाव रेयांश असे ठेवले असून, 4 मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता.