Vasai Vidhansabha Result 2024 : बहुजन विकास आघाडीला धोबीपछाड, वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे यांचा दणदणीत विजय

| Updated on: Nov 23, 2024 | 5:39 PM

वसई विधानसभेत भाजपाच्या स्नेहा दुबे यांचा विजय झाला आहे.त्यांनी दिग्गज उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करीत त्यांचे साम्राज्य खालसा केलेले आहे. काय म्हणाल्या त्या पाहा...

वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे -पंडीत यांचा विजय झालेला आहे. वसई मतदार संघातून सात उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.वसई विधानसभा मतदार संघात २०१४ पासून बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र विष्णू ठाकूर यांचा कब्जा आहे. यावेळी देखील हितेंद्र ठाकूर यांच्याशी भाजपाच्या स्नेहा दुबे पंडीत यांची मुख्य लढत झाली आहे. तर कॉंग्रेसने विजय गोविंद पाटील यांना तिकीट दिले होते आणि बहुजन समाज पार्टीने विनोद तांबे यांना उभे केले होते. तर आणखी तीन अपक्ष उमेदवार उभे राहीले होते. यात हिंतेंद्र ठाकूर यांचे इतक्या वर्षांचे साम्राज्य खालसा करीत भाजपाच्या स्नेहा दुबे यांचा दणदणीत विजय झालेला आहे.वसईचा सर्वांगीण विकासाबद्दल बोलत होतो. कोणावर आम्ही टीका केलेली. आम्ही वसईतील पाण्याची समस्या, हॉस्पिटल आणि शिक्षणाची समस्या यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असे विजय उमेदवार स्नेहा दुबे यांनी म्हटले आहे. भाजपाच्या स्नेहा दुबे यांना ७७,५५३ तर हितेंद्र ठाकूर यांना ७४,४०० आणि कॉंग्रेसच्या विजय गोविंद पाटील यांना ६२,३२४ मते मिळालेली आहेत.

 

Published on: Nov 23, 2024 05:33 PM
Maharashtra election result 2024 : ‘या’ दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?