कोवॅक्सिन लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना देणार, डॅा. वसंत खडतकर यांची माहिती

कोवॅक्सिन लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना देणार, डॅा. वसंत खडतकर यांची माहिती

| Updated on: Dec 29, 2021 | 9:56 AM

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठ्यांना दिलेल्या लसीचाच होणार वापर होणार असल्याचं डॉ. वसंत खडतकर यांनी म्हटलं आहे. मोठ्या व्यक्तींना दिलेली कोव्हॅक्सिन लस 15 ते 18 वयोगटाला देणार आहे. एक जानेवारीपासून नोंदणी, तीन जानेवारीपासून मुलांचं लसीकरण होणार आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठ्यांना दिलेल्या लसीचाच होणार वापर होणार असल्याचं डॉ. वसंत खडतकर यांनी म्हटलं आहे. मोठ्या व्यक्तींना दिलेली कोव्हॅक्सिन लस 15 ते 18 वयोगटाला देणार आहे. एक जानेवारीपासून नोंदणी, तीन जानेवारीपासून मुलांचं लसीकरण होणार आहे. लहान मुलांवर लसीची चाचणी करणारे डॅा. वसंत खडतकर यांनी ही माहिती दिली आहे. ‘लहान मुलांना 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस’ घ्यावे लागणार आहेत. ‘लहान मुलं ओमिक्रॅानचे सुपरस्प्रेडर असणार, म्हणून मुलांना लस द्या’, असं खडतकर म्हणाले. ‘ओमिक्रनपासून कोव्हॅक्सिन लहान मुलांना संरक्षण देणार’ असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘नागपुरात 550 मुलांवर झाली कोव्हॅक्सिनची चाचणी, फक्त एकाला हलका ताप आला होता. ’ ‘लहान मुलांसाठी लस सुरक्षित, पालकांनी मुलांना लस द्यावी’, असं खडतकर म्हणाले.

Published on: Dec 29, 2021 09:54 AM