राज ठाकरे यांचा अजितदादांना चिमटा, … पण आयुष्यात मला कधी काका म्हणू नको; नेमकं काय म्हणाले?
tv9 Marathi Special Report | पुण्यातून राज ठाकरे यांचे दोन शिलेदार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहेत. पुण्यासह आणि बारामती लोकसभेसाठी मनसेनं कंबर कसलीय. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावरही महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने लक्ष केंद्रीत केलं आहे.
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | पुण्यासह आणि बारामती लोकसभेसाठी मनसेनं कंबर कसलीय..त्यासाठी कामाला लागा नाहीतर हकालपट्टी करु, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. दरम्यान, पुण्यातून राज ठाकरेंचे दोन शिलेदार निवडणुकीसाठी सज्ज आहेत. ‘काम करा अन्यथा पदावरुन हकालपट्टी होईल’, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ही तंबीच दिलीय. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जोरदार राजकारण सुरु असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चांगलेच कामाला लागलेत. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा शहरांवर राज ठारकेंनी विशेष लक्ष आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि बैठक घेतली. यात राज यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा सल्ला देतानाच तंबीही दिलीय. महत्वाची बाब म्हणजे केवळ पुणे लोकसभाच नाही, तर सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघावरही मनसेनं लक्ष केंद्रीत केलंय.