‘मनसे’ला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे ‘वंचित’कडून लोकसभा लढणार
वसंत मोरे वंचितकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे कारण वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच वसंत मोरे वंचितकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे कारण वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितच्या आजच्या यादीत पुण्यातून वसंत मोरे, नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.