मुंगी कितीही लहान असली तरी..., मनसे-भाजप युती, निवडणुकांवरून वसंत मोरेंचा खोचक टोला

मुंगी कितीही लहान असली तरी…, मनसे-भाजप युती, निवडणुकांवरून वसंत मोरेंचा खोचक टोला

| Updated on: Mar 21, 2024 | 2:21 PM

मनसे आणि भाजप युतीवरही गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरही वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे. पण....

पुणे, २१ मार्च २०२४ : वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अद्याप त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. दरम्यान मनसे आणि भाजप युतीवरही गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरही वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे. पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत. त्यांना याबद्दल विचारा…, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. तर मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असं वक्तव्य करत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे.

Published on: Mar 21, 2024 02:19 PM