BIG Breaking : मनसे पाठोपाठ ‘वंचित’ची साथ सोडणारे वसंत मोरे उद्धव ठाकरेंचा हात धरणार, ‘या’ दिवशी होणार प्रवेश
लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडत वेगळी वाट निवडली आणि ते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेत. वंचितने त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. मात्र या निवडणुकीत त्याचा दारूण पराभव झाला. आता वंचितमधून बाहेर पडून वसंत मोरे उद्धव ठाकरेंचा हात धरणार
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ ‘वंचित’ची साथ सोडणारे वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांचा हात धरणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडत वेगळी वाट निवडली आणि ते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलेत. वंचितने त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली. मात्र या निवडणुकीत त्याचा दारूण पराभव झाला. आता वंचितमधून बाहेर पडून वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार असल्याचे त्यांनीच सांगितले. गुरूवारी वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान पुढील राजकीय भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितली. वसंत मोरे हे 9 जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती आहे.