… मग गांधीजीही ब्रिटिशांचे नोकर का? सावरकरांवरचे आजपर्यंतचे आरोप, काँग्रेसचा सर्वात मोठा भांडाभोड, वंशजांचा इशारा, वाचा सविस्तर!
आजपर्यंत काँग्रेसने वारंवार आरोप केले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत मी आतापर्यंतचे सगळे दावे खोडून काढणार आहे, अशी माहिती रणजित सावरकर यांनी दिली.
कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काल पत्रकार परिषदेत विनायक दामोदर सावरकर (Savarkar) यांचं जे पत्र दाखवलं, त्याचा अर्थ काय? राहुल गांधींचा दावा किती खोटा आहे, पत्रात नेमकं काय म्हटलंय, यासंबंधी खुलासेवार चिरफाड केली जाणार आहे. आज दुपारी साडे चार वाजता पत्रकार परिषदेत काँग्रेसचा मोठा भांडाफोड करणार असल्याचं वक्तव्य सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी केलंय. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी खास बातचित केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांसाठी काम करत होते, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु झालं आहे. हे आंदोलन योग्यच असल्याची भूमिका रणजित सावरकर यांनी मांडली. महाराष्ट्रातील जनतेचा आवाज राहुल गांधींच्या कानावर पडलाच पाहिजे, असं ते म्हणाले.
सावरककरांचं जे पत्र राहुल गांधी यांनी काल अकोला येथील पत्रकार परिषदेत सादर केलं, त्यावर बोलताना रणजित सावरकर म्हणाले, ‘ काल राहुल गांधींनी पुरावा म्हणून जे पत्र सादर केलं, त्याखाली your most obedient servant असं लिहिलं होतं. त्या काळी पत्राचा मायना लिहिण्याची पद्धत होती. गांधीजींचीही अशी पत्र आहेत. it is by honored to remain your humble… असं त्यांनी पत्रात लिहिलेलं आहे. मग गांधीजींच्या पत्राचा असा अर्थ काढायचा का? आपका नौकर बने रहते मुझे गर्व है… असा अर्थ मी काढणार नाही. तो मूर्खपणा ठरेल, असं प्रत्युत्तर रणजित सावरकर यांनी दिलं.
राहुल गांधींविरोधात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच पुण्यात वीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ जे बॅनर्स लावण्यात आले, त्याविरोधातही कारवाई केली जावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली.
पाहा सावरकरांचे वंशज काय म्हणाले?-
आजपर्यंत काँग्रेसने वारंवार आरोप केले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत मी आतापर्यंतचे सगळे दावे खोडून काढणार आहे. तसेच त्या काळात देशाच्या राजकारणात काँग्रेसचे नेते कसे वागत होते, याचेही पुरावे देणार आहे. काँग्रेसचा भांडाफोड करणार असल्याचं रणजित सावरकर यांनी सांगितलं. माफी कशाला म्हणतात, देशद्रोह कशाला म्हणतात, हे सगळे मी पुराव्यांसह बोलणार आहे. या सगळ्या पुराव्यांची चिरफाड करणार आहे, अशी माहिती रणजित सावरकर यांनी दिली. त्यामुळे राज्याचं लक्ष आता दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.