नागपुरच्या गृहिणींचं बजेट कोलमडलं, भाज्यांचे दर कमी पण टोमॅटो आणखी महाग, किलोसाठी किती दर?
VIDEO | सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान, पिकांचं नुकसान झाल्याने आवक कमी अन् टोमॅटोचे दर कडाडले
नागपूर, 31 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून मुंबईला झोडपणाऱ्या पावसामुळे भाज्याचे दर कडाडले आहेत. हिरल्या वाटाण्याने तर टॉमेटोच्या दराला देखील मागे टाकले आहे. दरवाढ झालेल्या किमतीनुसार, वाटाणा २४० रूपये प्रतिकिलो तर टॉमेटो १८० रूपयांवर पोहोचला आहे. गवार १२० रूपये प्रतिकिलो, फरस बी १२० रूपये, काकडी ४० रूपये, दुधी ८० रूपये, वांगी ८० रूपये, कारलं ८० रूपये प्रतिकिलो दरावर पोहोचले असताना आता नागपूराच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर २५० रुपये किलोवर पोहोचले आहे. तर इतर भाज्यांचे दर कमी होऊन ५० – ६० रुपये किलोपर्यंत आले आहे. पण टोमॅटो आणखी महाग झाले आहे. नागपूरच्या ठोक बाजारात अवघ्या सात गाड्या टोमॅटोची आवक होत आहे. परवडत नसल्याने छोट्या भाजी विक्रेत्यांनी टोमॅटोची विक्री केली बंद केली आणि ठोक बाजारात टोमॅटोच्या २५ किलोच्या एका कॅरेटची किंमत ३६०० ते ४००० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.