फक्त 90 रुपयांसाठी वकिलालाच भोगावा लागला 5 दिवसांचा करावास, नेमकी काय आहे भानगड?

फक्त 90 रुपयांसाठी वकिलालाच भोगावा लागला 5 दिवसांचा करावास, नेमकी काय आहे भानगड?

| Updated on: Feb 09, 2024 | 4:03 PM

न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी गोंदिया येथील एका वकिलाला 90 रुपये दंड किंवा दंड न भरल्यास 5 दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान दंड न भरल्यामुळे सदर वकिलाला 5 दिवसाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली.

भंडारा, ९ फेब्रुवारी २०२४ : एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश आणि खासगी वकील या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी न्यायालय अवमानप्रकरणी गोंदिया येथील एका वकिलाला 90 रुपये दंड किंवा दंड न भरल्यास 5 दिवसांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान दंड न भरल्यामुळे सदर वकिलाला 5 दिवसाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली. या प्रकरणाचा महाराष्ट्रात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान भंडारा येथेही जिल्हा वकील संघाच्या वतीने या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. गोंदिया किंवा भंडाऱ्यातच काय तर महाराष्ट्रात कुठेही अशी कारवाई झाल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असे मत भंडारा जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभात मिश्रा यांनी व्यक्त केले त्यावेळी जिल्हा वकील संघाचे सदस्य आणि वकील उपस्थित होते.

Published on: Feb 09, 2024 04:03 PM