जागावाटपावरून राऊत अन् आंबेडकर यांच्यात शाब्दिक चकमक, एकमेकांना पाडलं खोटं?

जागावाटपावरून राऊत अन् आंबेडकर यांच्यात शाब्दिक चकमक, एकमेकांना पाडलं खोटं?

| Updated on: Mar 13, 2024 | 12:11 PM

महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या शाब्दिक चकमक एकमेकांना खोटं पाडण्यापर्यंत पोहोचली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्रही लिहिले असून त्यांनी एका वेगळ्या आघाडीची ऑफरच त्यांना दिली

मुंबई, १३ मार्च २०२४ : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काही ठरत नाही. त्यातच संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तर दुसरीकडे त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना थेट पत्र लिहून ऑफरही दिल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या शाब्दिक चकमक एकमेकांना खोटं पाडण्यापर्यंत पोहोचली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्रही लिहिले असून त्यांनी एका वेगळ्या आघाडीची ऑफरच त्यांना दिली आहे. काँग्रेस आणि वंचितने सोबत बसून जागावाटपावर चर्चा करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, ‘लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा या किंवा पुढच्या आठवड्यात घोषित होऊ शकते. मात्र आळशीपणामुळे आणि कुठलीही घाई नाही या वागणुकीमुळे अद्याप मविआचं जागा वाटप झालेलं नाही’, बघा आणखी काय म्हटलंय पत्रात?

Published on: Mar 13, 2024 12:11 PM