Jalgaon | जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्यात वार : पलटवार
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचं नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचं नाव नसल्याचा आरोप करत खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही, हे गुलाबभाऊ झोपा काढतात काय? असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. तर, उन्मेष पाटील यांनी सकाळी यावं त्यांना सर्व हिशोब देऊ, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं. गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली.
गुलाबराव पाटील सोंगाडे मंत्री झाल्याचा आरोप
शेतकरी नुकसान भरपाई यादीत जळगाव जिल्ह्याचे नाव नाही,हे गुलाबभाऊ झोपा काढता काय? त्यांना लाज वाटली पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला. गुलाबराव पाटील हे पालक आहेत का बालक आहेत, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला. शेतकरी मोर्चामध्ये बोलताना ते म्हणाले, गिरीशभाऊ महाजन मंत्रिमंडळात असताना जिल्ह्यात सिंचनासाठी पैसे आणले.परंतु, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक पैसाही आणला नाही. एक वेळ या गुलाबभाऊंचा आवाज असायचा ते शिंगाडा मोर्चा काढायचे मात्र आता ते सोंगाडे मंत्री झाल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला. गुलाबराव पाटील मोर्चे काढायचे त्यावेळी ते खऱ्या अर्थाने वाघ वाटत होते.मात्र, आता सरकारमध्ये त्या वाघाची शेळी झाली आहे, अशी टीका भाजपच्या खासदारांनी केली. या मंत्र्यांना गावगावात फिरू देवू नका, असं आवाहन देखील उन्मेष पाटील यांनी केली.