Special Report | कोण संजय राऊत? अजित पवार यांनी थेट इग्नोरच केलं; पण का? काय घडतंय ‘मविआ’तील दोन नेत्यांमध्ये?
VIDEO | अजित दादा म्हणताय कोण संजय राऊत? 'मविआ'तल्याच दोन शाब्दिक तोफा आमने-सामने, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडताय. ते दोन नेते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि दुसरे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. अशातच अजित पवार यांनी कोण संजय राऊत असा खोचक टोला लगावला तर यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्वीट डीश असल्याचेच म्हटले आहे. कोण संजय राऊत म्हणत अजित पवार यांनी त्यांना इग्नोर करून त्यांना महत्त्व देणं टाळल्याचे पाहायला मिळत आहे. पण अजित पवार स्वीट डीश असल्याचे म्हणत पुढची शाब्दीक चकमक टाळण्याचा संजय राऊत यांनी प्रयत्न केला. तर सुरूवात कुठून झाली. भाजपमध्ये जाणार या सुरू असलेल्या चर्चांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पूर्णविराम दिला. तर काही जण राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याचे बोलतात. आमची वकीली करायची गरज नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊत यांना चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट