अपात्रतेवर आज महानिकाल, शिंदेंचे १६ तर ठाकरेंच्या १४ आमदारांच्या भवितव्याचा होणार फैसला

अपात्रतेवर आज महानिकाल, शिंदेंचे १६ तर ठाकरेंच्या १४ आमदारांच्या भवितव्याचा होणार फैसला

| Updated on: Jan 10, 2024 | 12:42 PM

एकनाथ शिंदे यांच्या १६ तर उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदारांच या अपात्रतेच्या निकालानं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना त्याचे वाचन करतील. आज बुधवारी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन करणार

मुंबई, १० जानेवारी २०२४ : आज दिवसात मोठी घडामोड घडणार आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या १६ तर उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदारांच या अपात्रतेच्या निकालानं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना त्याचे वाचन करतील. आज बुधवारी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन करणार आहे. तर या अपात्रतेच्या निकालापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली आहे. तर रश्मी शुक्ला यांच्यासह विवेक फणसाळकर हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिंदेच्या शिवसेनेतील १६ आमदारांमध्ये स्वतः एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर हे आहेत. तर ठाकरेंच्या १४ आमदारांमध्ये अजय चौधरी, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, भास्कर जाधव. राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंग राजपूत, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील आणि सुनील राऊत यांचा समावेश आहे.

Published on: Jan 10, 2024 12:42 PM