Lal Krishna Advani Health : लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
अचानक लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यात लालकृष्ण आडवाणी यांना चौथ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालवल्याचे समोर आले आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यात लालकृष्ण आडवाणी यांना चौथ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे आज शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, लालकृष्ण आडवाणी यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर गेल्या 3 जुलै रोजी लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी आडवाणींना 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी आडवाणी यांच्यावर एक छोटीशी सर्जरी झाली होती. त्यानंतर ते न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर गेल्या काही काळापासून लालकृष्ण आडवाणी आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरीच असल्याची माहिती आहे.