Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ला आणखी अटी लावा अन् ‘यांना’ लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
मनसेचे नेते, भाजपचे नेते आणि त्या पाठोपाठ आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदूत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेनंही दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा लाभ देऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केलीय. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मनसेचे नेते, भाजपचे नेते आणि त्या पाठोपाठ आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदूत्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेनंही दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा लाभ देऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केलीय. लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदूत्त्ववादी संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. यासह “दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देऊ नका” विश्व हिंदू परिषदेनं ही मागणी केली आहे. तर रामलालला दोन मुलं आणि अब्दूलला तीन पत्नी आठ मुलं असल्यास त्याला सहापट जास्त लाभ मिळेल, असंच चालत राहिलं तर जनसंख्या नियंत्रण कसं करणार, आपली लोकसंख्या १५० कोटींवर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत एक अट घालावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी केलीय. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.