विजय आपलाच, फक्त औपचारिकता बाकी; शुभांगी पाटील यांचा दावा
धनशक्ती जिंकू देऊ नका, जनशक्ती जिंकून द्या, शुभांगी पाटील यांचे मतदारांना आवाहन
राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. तर येत्या 2 तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे या पाचही निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना शुभांगी पाटील यांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे.
आजचा दिवस महत्वाचा तर आहे पण आजच्या दिवशी जनतेचा विजय होणार आहे. महाविकास आघाडीचे शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदगर जिल्ह्यातील सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे विजय आपलाच आहे फक्त औपचारिकता बाकी असल्याचे शुंभागी पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले, मतदान जास्त झाले पाहिजे. त्यामुळे धनशक्ती जिंकू देऊ नका, जनशक्ती जिंकून द्या.
Published on: Jan 30, 2023 09:34 AM
Latest Videos