Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकरांचा विजय पुण्यात, पण जल्लोष मालेगावात...

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकरांचा विजय पुण्यात, पण जल्लोष मालेगावात…

| Updated on: Mar 02, 2023 | 8:53 PM

रवींद्र धंगेकरांनी २८ वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा रोवला आहे. या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मालेगाव : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे राज्यभरातील लोकांचं लक्ष लागून होतं. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर यांना सुरुंग लावण्यात मोठं यश आलं आहे. उमेदवारी मिळाल्यापासूनच ते चर्चेत होते.कसब्यात भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना मैदानात उतरवलं. कसब्यात धंगेकर यांनी आक्रमकपणे प्रचार केला आणि भाजपचा गड मिळवला. शिवसेनेतून रवींद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर पुढे ते काँग्रेसमध्ये आले. धंगेकर हे ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनसामान्यात त्यांची उंची वाढत गेली.

रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष मालेगावात देखील पाहायला मिळाला. कारण ते ज्या समाजातून तो लोणारी समाज या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धंगेकरांच्या विजयाने लोणारी समाजाने ही जल्लोष केला. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांनी पुण्यात आपली ओळख निर्माण केली.रवींद्र धंगेकर हे ओबीसी समाजातून येतात. कसबा मतदारसंघात ओबीसी आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धंगेकर यांचं राजकीय वजन वाढत गेलं.

Published on: Mar 02, 2023 08:48 PM