Vidarbha | विदर्भाच्या 11 जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, 4 दिवसात एकही कोरोनामृत्यू नाही

Vidarbha | विदर्भाच्या 11 जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, 4 दिवसात एकही कोरोनामृत्यू नाही

| Updated on: Aug 12, 2021 | 9:50 AM

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.

विदर्भातील 11 ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. इतकंच नाही तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर विदर्भात गेल्या 24 तासांत 14 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा हे जिल्हे येतात. या सर्वच जिल्ह्यांमध्ये आता कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे