Video: अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणीत वाढ, चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

| Updated on: Jul 26, 2022 | 1:12 PM

रणवीरने केलेल्या फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचे कारण देत एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती.

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रणवीर सिंह विरीधात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूड फोटोशूट (Photoshoot) प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपाहार्य पोस्ट विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरने केलेल्या फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्याचे कारण देत एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे याबद्दल अद्याप पोलिसांनी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या तक्रारीमुळे रणवीर सिंह यांच्या अडचणीत नाक्कीच वाढ झाली आहे.

Published on: Jul 26, 2022 01:12 PM