Video: नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस

Video: नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस

| Updated on: Sep 09, 2022 | 9:46 AM

प्रवासी बस गोदाघाट परिसरामध्ये पार्क करण्यात आलेली होती. अचानक पाण्याचा विसर्ग झाल्याने बसला पाण्याचा वेढा पडला. सुदैवाने यात कुठलेही प्रवासी नव्हते.

मुसळधार पावसाचा फटका नाशिकलाही बसला आहे. नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात एक व्होल्वो बस अडकली आहे. बस काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये साचलेल्या पाण्यात ही बस अडकली आहे. गंगापूर धरणाच्या पाण्याचा विसर्ग झाल्याने पाणी गोदाघाट परिसरामध्ये आले आणि तिथेच ही बस रात्रभरापासून अडकून पडलेली आहे. प्रवासी बस गोदाघाट परिसरामध्ये पार्क करण्यात आलेली होती. अचानक पाण्याचा विसर्ग झाल्याने बसला पाण्याचा वेढा पडला. सुदैवाने यात कुठलेही प्रवासी नव्हते.

 

Published on: Sep 09, 2022 09:45 AM
Video : मुसळधार पावसाने शाळेत पाणी शिरलं! 170 विद्यार्थी शाळेतच अकडले, पालकांचा जीव टांगणीला
Video: लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी