Video | सारंगखेडा चेतक फेस्टीव्हलमध्ये घोड्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन

| Updated on: Dec 29, 2023 | 9:19 PM

सारंगखेडा येथील घोडेबाजाराला 400 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. हा बाजार 18 व्या शतकापासून जातीवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आधी राजस्थानातील पुष्करला , मग पंढरपूरला आणि मग सारंखेडा येथे हा बाजार भरतो. यानंतर हा बाजार नांदेडच्या माळेगावला नंतर तेथून उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपूरला जातो. साल 2005 पासून याला चेतक फेस्टीव्हल म्हणून ओळखले जात आहे.

नंदूरबार | 28 डिसेंबर 2023 : सारंगखेडा चेतक फेस्टीव्हलमध्ये यंदा तीन हजाराहून अधिक घोडे सामील झाले आहेत. या घोड्यांची खास बडदास्त ठेवली जात आहे. या फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी खास नामवंत जातीचे घोडे बाजारात आणले जातात. या घोड्यांना खास खुराक दिला जातो. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. या घोड्यांच्या देखभालीसाठी रात्रपाळीतही माणसे ठेवली जात असते. घोड्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांना विशेष पेहराव घातला जात आहे. या घोड्यांचे नृत्य पाहण्यासाठी येथे प्रचंड गर्दी होत आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या इशाऱ्यावर आणि हलगीच्या तालावर घोड्यांची पावले थिरकत आहेत. घोड्यांचे नृत्य कौशल्य पाहून सर्वसामान्य प्रेक्षकांच्याकडून टाळ्यांचा वर्षावर होत आहे. सारंगखेडा येथील घोडे बाजार तापी नदीच्या किनारी वसविण्यात येत असल्याने येथे रात्रीची प्रचंड थंडी पडत असते. ही थंडी घोड्यांना बाधू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

Published on: Dec 28, 2023 04:04 PM
Video | सारंगखेडा घोडेबाजारात थंडी बाधू नये म्हणून घोड्यांची घेतली जाते विशेष काळजी
Video | अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात अभिनयच केला ! मंत्री अनिल पाटील यांची टीका