VIDEO : Shivsena Shinde Conflict | Prabhadevi Shiv Sena Firing | प्रभादेवी परिसरात शिवसेना-शिंदे गटात राडा
मुंबईतील प्रभादेवी भागात शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी वेळी स्वागत कक्षावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. विशेष म्हणजे याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबईतील प्रभादेवी भागात शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी वेळी स्वागत कक्षावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. विशेष म्हणजे याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी केला असून आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केलीयं.
Latest Videos