VIDEO : Nagpur Congress Protest | सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केलायं. या चाैकशीविरोधात आज नागपूरात आंदोलन करण्यात आले. इतकेच नव्हेतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याच्या आरोपही काँग्रेसने केला आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केलायं. या चाैकशीविरोधात आज नागपूरात आंदोलन करण्यात आले. इतकेच नव्हेतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याच्या आरोपही काँग्रेसने केला आहे. नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला होता. मात्र सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या चौकशीला हजर राहू शकल्या नव्हत्या. तर राहुल गांधी हे ईडी समोर चौकशीला हजर राहिले होते. ईडीने राहुल गांधी यांना या प्रकरणाबाबत अनेक सवाल केले आहेत. मात्र त्यांची समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याची ही माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली होती. तसेच सोनिया गांधी यांचीही तीन तासांसाठी ईडी चौकशी पार पडली होती.
Latest Videos