Video: राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार राहिलं पाहिजे- राजेश टोपे
लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये राजकारण्यांनी कायमच तयार असायला पाहिजे, त्यासाठी निवडणुकाच असायला हव्या हे गरजेचे नाही असे मत टोपे यांनी व्यक्त केले.
राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार राहिलं पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिवेशन आहे असेही टोपे म्हणाले. लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये राजकारण्यांनी कायमच तयार असायला पाहिजे, त्यासाठी निवडणुकाच असायला हव्या हे गरजेचे नाही असे मतही टोपे यांनी व्यक्त केले. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक गोष्टीचे ठराव आम्ही करत असतो, सध्या आम्ही परिस्थितीशी सामना करतोय असेही राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केले. तसेच कोरोनामध्ये राजकारण करू नये असे मत देखील राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी व्यक्त केले.